पुढारी वृत्तसेवा
जगात सर्वात मोठ्या छत्र्या उभ्या केल्या आहेत सौदी अरेबिया देशाने. त्या फक्त शो साठी नाहीत तर प्रार्थना करणाऱ्या भाविकांचे ऊन वाऱ्या पासून संरक्षण व्हावे म्हणून
सौदी अरेबियातील मदीना येथील अल मस्जिद अल नवाबी या मशिदीच्या प्रांगणात उभारलेल्या अद्ययावत अभियांत्रिकीचे उदाहरण म्हणजे या 250 भल्या मोठ्या छत्र्या
मदीना सऊदी अरबच्या वाळवंटात असून दिवसा तापमान खूप जास्त असते. या छत्र्या तिव्र उन्हापासून लोकांना सावली देतात, जेथे लाखो भक्त प्रार्थना करतात
छत्र्यांमुळे परिसरातील तापमान 8 °C एवढेही कमी होऊ शकते. पावसापासून आणि वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यापासूनही संरक्षण होते
प्रत्येक छत्री उघडल्यावर सुमारे 25.5 मीटर × 25.5 मीटर ( 625 m²) इतकी जागा व्यापते. हे दृश्य अतिशय विंहगम असते.
या प्रत्येक छत्रीची उंची सुमारे 22 मीटर इतकी आहे म्हणजे जवळपास 65 फूट किंवा 7 मजली इमारतीइतकी आहे
वैशिष्ट्ये म्हणजे या एका छत्रीच्या छताखाली 900 हून अधिक लोक सहज बसू आणि प्रार्थना करू शकतात.
या एकूण 250 छत्र्या आहेत आणि सगळ्या एकत्रितपणे उघडल्यावर 143,000 m² पेक्षा जास्त क्षेत्र झाकून सावली देतात.
या छत्र्या आधुनिक अभियांत्रिकीचे उदाहरण आहेत. प्रत्येक छत्री स्वयंचलितपणे उघडते आणि बंद होते
सकाळी जेव्हा मस्जिद उघडते किंवा भाविकांची गर्दी वाढायला लागते, तेव्हा छत्र्या हळूहळू उघडता व सायंकाळी उन गेल्यानंतर या हळहळू बंद होतात.
प्राथनेच्या वेळी काही छत्र्यांमध्ये कूलिंग सिस्टीम आहे. पाण्याचे हलके फवारे (mist) सोडू शकतात त्यामुळे तापमान आणखी कमी होते.