Gas Trouble : वारंवार पोटात गॅस अस्वस्थ करतो; स्वयंपाकघरातील हे पदार्थ देतील आराम

पुढारी वृत्तसेवा

पोटात गॅस होणे हे कॉमन झाले आहे, खाण्यापिण्याच्या सवयी, अपुरी झोप, तळलेले पदार्थ सेवन, जंक फूड इत्‍यादी बरीच कारणे यासाठी असतात स्वयंपाक घरातील काही पदार्थ खूप उपयुक्त ठरु शकतात

चिमूटभर हिंग कोमट पाण्यात मिसळून प्यायल्याने पोटातील गॅस त्वरित बाहेर पडण्यास मदत होते. लहान मुलांच्या बाबतीत हिंगाची पेस्ट बेंबीभोवती लावणे फायदेशीर ठरते.

अर्धा चमचा ओवा आणि थोडे काळे मीठ एकत्र चावून खावे, नंतर कोमट पाणी प्यावे. ओव्यामधील 'थायमॉल' घटक पचनक्रिया वेगाने सुधारतो.

आल्याचा छोटा तुकडा काळे मीठ लावून चावून खावा किंवा आल्याचा ताजा चहा प्यावा. आले पोटातील पाचक रस उत्तेजित करते आणि जडपणा कमी करते.

एक चमचा जिरे एका ग्लास पाण्यात उकळून ते कोमट असताना प्यावे. जिऱ्यातील अँटीऑक्सिडंट्स गॅस, ॲसिडिटी आणि पोटदुखीवर उत्तम काम करतात.

बडीशेप: जेवणानंतर एक चमचा बडीशेप चावून खाल्ल्याने किंवा बडीशेपचे पाणी उकळून प्यायल्याने अन्नाचे पचन चांगले होते आणि पोट फुगत नाही.

दुपारच्या जेवणानंतर ताज्या ताकात थोडे काळे मीठ, भाजलेली जिरेपूड आणि चिमूटभर हिंग घालून प्यायल्याने पोटाला थंडावा मिळतो.

जेवताना घाईघाईने न खाता घास नीट चावून खा, जेणेकरून जेवताना हवा पोटात जाणार नाही. जेवल्यानंतर लगेच झोपणे टाळा; किमान १५ ते २० मिनिटे शतपावली करा.

गॅसची समस्या वारंवार होत असल्यास अतिमसालेदार पदार्थ, हरभरा डाळ, कोबी आणि शीतपेये यांचे प्रमाण कमी ठेवा.

रताळीची पाने