Gardenia Jasminoides | मनमोहक सुवासाचा राजा 'गंधराज'! तुमची चिंता - भीतीही कमी करेल!

पुढारी वृत्तसेवा

गंधराज ही अश वनस्पती आहे जी तुमच्या बागेत किंवा कुंडीत असल्यास तुमचे मन प्रसन्न ठेवेल, कारण याचा सुवास गोड मनमोहक असतो

या वनस्पतीची फुले अतिशय तीव्र आणि मनाला प्रसन्न करणाऱ्या गोड सुवासासाठी जगभर प्रसिद्ध आहेत. संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी यांचा सुगंध अधिक दरवळतो.

या फुलांच्या सुवासात मनाला शांत करण्याचे नैसर्गिक गुणधर्म असतात मानसिक ताण, चिंता (Anxiety) यावर हा सुवास प्रभावी ठरतो

अरोमाथेरपी मध्ये या फूलांच्या सुगंधाचा वापर केला जातो यामुळे निद्रानाश (Insomnia) समस्या काही अंशी कमी होऊ शकते

गंधराजाची फुले दुधाळ पांढऱ्या किंवा हलक्या पिवळसर रंगाची असतात. पाकळ्यांची रचना मखमली आणि गुलाबासारखी सुंदर, दाट असते.

गंधराजाच्या फुलांमधील तीव्र आणि मनमोहक सुवासामुळे परफ्यूम, अत्तर, सुगंधी मेणबत्त्या, रूम फ्रेशनर आणि लक्झरी साबण तयार करण्यासाठी याच्या अर्काचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो.

या झाडाची पाने गडद हिरवी, मखमली आणि चमकदार असतात. फुले नसतानाही केवळ पानांच्या देखणेपणामुळे हे झाड बागेची शोभा वाढवते.

फुलांचा हंगाम संपल्यानंतर झाडाची हलकी छाटणी केल्यास झाडाला भरपूर नवीन फांद्या फुटतात आणि पुढच्या हंगामात भरपूर कळ्या येतात.

गृहसजावट, बाल्कनी गार्डनिंग किंवा कुंडीत लावण्यासाठी ही वनस्पती अत्यंत लोकप्रिय आहे. वास्तुशास्त्रानुसार घरात गंधराजाचे रोप लावल्याने सकारात्मक ऊर्जा आणि प्रसन्न वातावरण राहते.