पुढारी वृत्तसेवा
गनेट (Gannets) पक्षी शिकारीसाठी समुद्रात मृत्यूलाही आव्हान देणाऱ्या डुबक्यांसाठी जगभर प्रसिद्ध आहेत. यामुळे त्यांना इतर पक्ष्यांपेक्षा जास्त खोलवर मासे पकडता येतात.
मासे पकडण्यासाठी गनेट हा पक्षी सुमारे सुमारे ४० मीटर (एका १० मजली इमारतीएवढ्या) उंचीवरून समुद्रात बाणासारखे घुसतात. या वेळी त्यांचा वेग १०० किलोमीटर प्रति तास एवढा असतो!
इतक्या प्रचंड वेगाने पाण्यात आदळूनही त्यांना कोणतीही इजा होत नाही, याचे कारण त्यांना मिळालेले निसर्गिक शरीर रचना आहे.
या पक्षाला बाहेर दिसणाऱ्या नाकपुड्या नसतात. ते तोंडातून श्वास घेत असल्याने वेगाने पाण्यात शिरताना त्यांच्या श्वसनमार्गात पाणी शिरत नाही.
या पक्षाच्या चेहऱ्याच्या आणि छातीच्या त्वचेखाली व स्नायूंमध्ये हवेच्या पिशव्यांचे मोठे जाळे असते. हे जाळे 'बबल रॅप' किंवा गाडीतील शॉक ॲब्झॉर्बर प्रमाणे काम करते.
पाण्यात आदळताना छातीच्या त्वचेखाली व स्नायूंमध्ये हवेच्या पिशव्यांचे मोठे जाळे 'एअरबॅग्ज'प्रमाणे त्यांना धक्क्यांपासून वाचवतात आणि शरीराला आधार देतात.
पाण्यात डुबकी मारण्यापूर्वी त्यांच्या लांब मानेतील स्नायू मणक्यांना (पाठीच्या हाडांना) घट्ट पकडून ठेवतात.यामुळे, जोरदार धक्क्यामुळे मानेला धक्का बसत नाही.
गनेटची चोच आणि चेहरा खूप मजबूत असतो. चोचीच्या मुळाशी जाड आणि स्पॉंजी हाडे असतात, जे चेहऱ्याला अधिक बळकट बनवतात.