पुढारी वृत्तसेवा
गणपती बाप्पाला बुद्धीची देवता मानले जाते. बुद्धी, स्मरणशक्ती व पर्यायाने मेंदूची क्षमता वाढवण्यासाठी काही पदार्थांचे सेवन गुणकारी ठरते, असे तज्ज्ञ सांगतात.
काही विशिष्ट पदार्थांमध्ये असे पोषक घटक असतात, जे थेट मेंदूच्या कार्यक्षमतेवर सकारात्मक परिणाम करतात.
अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते.
ओमेगा-3 फॅटी अॅसिड मेंदूच्या पेशींच्या निर्मितीसाठी आणि त्यांच्या योग्य कार्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
याच्या नियमित सेवनाने स्मरणशक्ती सुधारते आणि अल्झायमरसारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते.
बदामामध्ये व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंटस् मुबलक प्रमाणात आढळतात.
व्हिटॅमिन ई मेंदूच्या पेशींना ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून वाचवते, ज्यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते.
भोपळ्याच्या लहान लहान बिया मेंदूसाठी अत्यंत फायदेशीर आहेत. यामध्ये मॅग्नेशियम, झिंक, तांबे आणि लोह यांसारखी महत्त्वपूर्ण खनिजे असतात.