पुढारी वृत्तसेवा
बाप्पाला दुर्वा का प्रिय?
गणपतीला दुर्वा अत्यंत प्रिय मानल्या जातात. गणेश पूजेत दुर्वांना विशेष महत्त्व आहे.
दुर्वांमागे आहे पौराणिक कथा
अनलासुर नावाच्या असुराचा वध करून त्याला गिळल्यानंतर गणपतीच्या शरीरात प्रचंड उष्णता निर्माण झाली.
दुर्वा अर्पण केल्याने मिळाला आराम
पौराणिक कथेनुसार, ऋषींनी गणपतीला दुर्वा अर्पण केल्या. दुर्वा ग्रहण केल्यानंतर बाप्पाला आराम मिळाला.
तेव्हापासून सुरू झाली परंपरा
या पौराणिक कथेमुळे गणेश पूजेमध्ये दुर्वा अर्पण करण्याची परंपरा सुरू झाल्याचे मानले जाते.
२१ अंकाला विशेष महत्त्व
हिंदू धार्मिक परंपरेत २१ हा अंक शुभ आणि विशेष आध्यात्मिक महत्त्वाचा मानला जातो.
२१ तत्त्वांचे प्रतीक
एका मान्यतेनुसार, ५ ज्ञानेंद्रिये, ५ कर्मेंद्रिये, ५ प्राणशक्ती, ५ तत्त्वे आणि मन मिळून २१ तत्त्वे होतात.
देवाच्या चरणी समर्पण
गणपतीला २१ दुर्वा अर्पण करणे म्हणजे या २१ तत्त्वांचे देवाच्या चरणी समर्पण करण्याचे प्रतीक मानले जाते.
दुर्वा कशा अर्पण करतात?
पूजेनंतर दुर्वांची जुडी तयार करून त्या गणपतीच्या चरणी अर्पण केल्या जातात. यावेळी गणपती मंत्राचा जप केला जातो.
दुर्वांसोबत हेही अर्पण करा
दुर्वांसोबत गणपतीला मोदक किंवा लाडू, शेंदूर, लाल फुले आणि फळे अर्पण करण्याचीही परंपरा आहे.