Namdev Gharal
महाराष्ट्रात अनेक शहरांमध्ये ग्रामीण भागांमध्ये मध्यमवयीन किंवा वृद्व लोकांची तसेच किंवा काही शाळांची ओळख म्हणजे पांढरया रंगाची गांधी टोपी
तुम्हाला माहिती आहे का या गांधी टोपीचा इतिहास रंजक आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी हे या टोपीचे जनक आहेत. त्यांनी स्वातंत्य्र चळवळीला या टोपीमुळे एक ओळख निर्माण करुन दिली
महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेत वर्णद्वेषाविरुद्ध लढा देत होते, तेव्हा त्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते. तिथे भारतीय आणि कृष्णवर्णीय कैद्यांना डोक्यावर घालण्यासाठी एक विशिष्ट आकाराची पांढरी टोपी दिली जात असे.
ही टोपी पाहून त्यांना या गांधी टोपीची कल्पना सुचली भारतात परतल्यावर त्यांना काश्मिरी टोपीवरुन या टोपीचे डिझाईन व प्रेरणा सुचली
जेव्हा गांधीजींनी स्वातंत्र्यलढा सुरू केला, तेव्हा त्यांना संपूर्ण देशासाठी एक समान, स्वस्त आणि स्वदेशी ओळख हवी होती. पूर्वीचे फेटे किंवा पगड्यांसाठी खूप कापड लागायचे आणि त्या रोज धुणे कठीण असायचे. यासाठी टोपी उपयोगी होती.
या बाबात काका कालेलकरांशी बोलताना सांगितले की काश्मिरी टोपी वरुन एक टोपी तयार करता येईल. पण काश्मिरी टोपी लोकरीची बनवली असायची ती वापरायला व धुवायला अडचणीची आहे
मग गांधीजींनी लोकरीच्या कापडाऐवजी खादीचे कापड वापरून ही टोपी तयार करून घेतली. व त्यासाठी पांढरया रंगाची निवड केली
पांढरा निवडण्यामागे कारण असे होते की, पांढऱ्या रंगावर घाण लगेच दिसते, त्यामुळे ती वारंवार धुवावी लागेल आणि स्वच्छतेची सवय लागेल. तसेच ही टोपी घडी करून सहज खिशात ठेवता येत असे.
१९२०-२२ च्या असहकार आंदोलनादरम्यान काँग्रेसचे कार्यकर्ते आणि स्वातंत्र्यसैनिकांनी ही टोपी मोठ्या प्रमाणावर वापरायला सुरुवात केली. गांधीजींनी स्वतः ही टोपी लोकप्रिय केल्यामुळे जनतेने हिला 'गांधी टोपी' हे नाव दिले.
स्वातंत्र्यलढ्यात ही टोपी 'देशभक्ती' आणि 'स्वदेशी'चे सर्वात मोठे प्रतीक बनली. ही टोपी घातलेला माणूस ब्रिटिश सरकारविरोधी आहे, असे मानले जाई. ब्रिटिश सरकारने सरकारी कार्यालयांमध्ये आणि कोर्टात ही टोपी घालण्यावर बंदी घातली होती.
महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचा ती एक अविभाज्य भाग बनली आहे. वारकरी संप्रदाय, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिक आजही दैनंदिन जीवनात ही टोपी अभिमानाने घालतात.
महाराष्ट्रात लग्नसमारंभात मानपानाचा 'आहेर' म्हणून पांढरी टोपी आणि टॉवेल देण्याची मोठी परंपरा आहे. तसेच मुंबईचे प्रसिद्ध 'डबेवाले' आजही त्यांची मुख्य ओळख म्हणून ही टोपी घालतात
भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, मोरारजी देसाई यांच्यापासून ते अगदी अलीकडच्या काळातील अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनामध्येही ही टोपी वापरली होती
आणि 'आम आदमी पार्टी'च्या स्थापनेपर्यंत ही टोपी राजकीय आणि सामाजिक आंदोलनाचे मुख्य प्रतीक राहिली आहे. थोडक्यात सांगायचे तर, गांधी टोपीचा जन्म संपूर्ण भारताला एकसंध करण्यासाठी झाला होता.