Fruits in Fridge: ही फळे फ्रीजमध्ये ठेवत असाल तर सावधान! होऊ शकतात गंभीर परिणाम

अमृता चौगुले

अन्न जास्त काळ टिकवण्यासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवतो

पण फ्रीजमध्ये काय ठेवावे याचे वर्गीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे

काही पदार्थ फ्रीजमध्ये टिकतात उलट काहींचे आयुष्य फ्रीजमुळे कमी होते

काही फळे अजिबात फ्रीजमध्ये ठेवू नये. जाणून घ्या याविषयी

केळी अजिबात फ्रीजमध्ये ठेवू नयेत. त्याची साले काळी पडून लवकर खराब होतात

पपईदेखील फ्रीजमध्ये ठेवणे टाळावे. त्याच्या चवीत बदल होऊ शकतो

अवाकाडो हे फळ फ्रीजमध्ये ठेवल्याने कठीण बनते. त्यामुळे चवीत बदल होतो

सफरचंद फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याला इतर पदार्थांचा वास लागू शकतो. तसेच चवीत आणि टेक्स्चरमध्ये बदल होतो