अभिनेत्री गुल पनागने सोशल मिडियावर काही खास फोटो शेयर केले आहेत.गुलबाबत बोलताना तिचे फॅन्स कायम ब्युटी विथ ब्रेन असा तिचा उल्लेख करतात. 1999 मध्ये तिने Miss India किताब जिंकला .त्यानंतर काही काळ अभिनय क्षेत्रात घालवल्यानंतर तिने राजकीय क्षेत्रातही नशीब आजमावले.गुल एक उत्तम रायडर आहे तसेच फॉर्म्युला कार रेसरदेखील आहे.तसेच ती सर्टिफाईड कमर्शियल पायलट ही आहे.तसेच आता ती उद्योजिका बनली आहे. ईलेक्ट्रॉनिक व्हेईकलच्या क्षेत्रात तिने नवीन व्हेंचर सुरू केले आहे