पुढारी वृत्तसेवा
फ्रिजमध्ये वास का येतो?
जुने अन्न, सांडलेले पदार्थ आणि ओलावा यामुळे फ्रिजमध्ये दुर्गंधी निर्माण होते.
बेकिंग सोडाचा वापर
एक वाटीत बेकिंग सोडा ठेवला तर तो वास शोषून घेतो.
लिंबाचा उपयोग करा
लिंबाच्या फोडी ठेवून किंवा पाण्यात मिसळून साफ केल्यास फ्रेश सुगंध येतो.
व्हिनेगरने स्वच्छता
व्हिनेगर पाण्यात मिसळून फ्रिज पुसल्यास डाग आणि जंतू निघून जातात.
कॉफी पावडर ट्रिक
कॉफी पावडर छोट्या बाउलमध्ये ठेवली तर ती दुर्गंधी दूर करते.
कोळसा (Charcoal) वापरा
कोळसा नैसर्गिकरीत्या वास शोषून घेण्यासाठी खूप उपयोगी आहे.
नियमित साफसफाई महत्त्वाची
आठवड्यातून एकदा फ्रिज साफ केल्यास डाग आणि वास टाळता येतो.
अन्न व्यवस्थित ठेवा
एअरटाइट डब्यांमध्ये अन्न ठेवल्यास वास पसरत नाही.
ओलावा टाळा
फ्रिजमध्ये पाणी सांडले तर लगेच पुसा, यामुळे बॅक्टेरिया वाढत नाहीत.