अंजली राऊत
हिवाळ्यात काहीजणांना सर्दी-खोकल्याने त्रस्त असलेल्यांना वारंवार शिंका येतात.
शिंक येणे एक सामान्य समस्या आहे, जी कधीही, कोणत्याही वेळी येऊ शकते.पण वारंवार येणाऱ्या शिंका तुम्हाला त्रास देऊ शकतात
अशा परिस्थितीत, काही घरगुती उपायांनी तुम्ही शिंकेपासून आराम मिळवू शकता.
शिंकेतून आराम मिळवण्यासाठी तुम्ही एक चमचा आल्याचा रस घ्या. त्यामध्ये अर्धा चमचा गूळ घालून दिवसातून असे दोन ते तीन वेळा खा.
शिंकेतून आराम मिळवण्यासाठी, एका ग्लास गरम पाण्यात एक चमचा मध आणि अर्धा चमचा दालचिनी पावडर मिक्स करून प्या.
याव्यतिरिक्त, एका ग्लास पाण्यात एक चमचा ओवा घालून ते उकळवा आणि कोमट झाल्यावर गाळून घ्या आणि मध मिसळून प्या.