फ्रिजमधली कणीक किती दिवस वापरायला योग्य? जाणून घ्या...

पुढारी वृत्तसेवा

स्वयंपाकासाठीचा वेळ वाचतो, पण फ्रिजमधली कणीक किती दिवस सुरक्षित राहते, गुणवत्‍ता बदलते का याबाबत जाणून घ्या.

चुकीच्या पद्धतीने किंवा जास्त दिवस ठेवलेले कणीक आंबट होते. बॅक्टेरिया वाढण्याचा धोका असतो.

जास्त दिवसाचे कणीक वापरल्याने पौष्टिक मुल्य कमी होते. अपचनाचा धोका वाढतो.

फ्रिजमधले कणीक खराब होण्याच थांबत नाही. त्‍याच्यात हळूवार बदल होत असतात. त्‍यात कार्बनडाय ऑक्साईड आणि बॅक्टेरिया तयार होतात.

याचा परिणाम कणकेच्या चवीवर व वासावर होतो. दोन दिवसानंतर कणकेत आंबटपणा येतो.

जास्त दिवसानंतर कणकेतील ग्लुटेन सैल पडते. त्‍यामुळे चपाती नीट तयार होत नाही. अशा कणकेच्या चपातीमुळे अपचन, गॅस समस्या होउ शकते.

जास्त वेळ ठेवलेल्या कणकेतील पोषण मुल्य ही कमी-कमी होत जातात. ज्यामुळे पोट भरेल पण पोषण मिळणार नाही.

जास्त वेळ ठेवलेल्या कणकेची पोळी खाल्ल्याने रक्तातील साखर वेगाने वाढू शकते

कणीक 24 तासांपेक्षा जास्त वेळ फ्रिजमध्ये ठेवणे टाळावे. जास्त वेळ ठेवलेल्या कणकेमुळे चव, पोषण आणि पचनावर वाईट परिणाम होउ शकतो.

वरील माहिती वाचकापर्यंत पोहोचवणे इतकाच हेतू आहे. तज्ञांच्या सल्ल्यानेच कोणतेही अनुकरण करावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.