पुढारी वृत्तसेवा
कच्चे किंवा अपूर्ण शिजलेले अन्न टाळा
कच्चे मांस, अंडी किंवा अपूर्ण शिजलेले अन्न खाल्ल्यास इन्फेक्शनचा धोका वाढतो.
जास्त कॅफिन टाळा
कॉफी, चहा किंवा कॅफिनयुक्त पेये जास्त प्रमाणात घेतल्यास बाळाच्या विकासावर परिणाम होऊ शकतो.
पॅकेज्ड आणि जंक फूड टाळा
फास्ट फूड, पॅकेज्ड स्नॅक्समध्ये प्रिझर्व्हेटिव्ह्स आणि जास्त मीठ-साखर असते, जे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
कच्चे पपई आणि अननस टाळा
कच्चे पपई आणि जास्त प्रमाणातील अननस गर्भाशयावर परिणाम करू शकतात, त्यामुळे ते टाळणे योग्य.
जास्त साखर आणि गोड पदार्थ टाळा
जास्त गोड पदार्थ खाल्ल्यास गर्भावस्थेतील मधुमेह (Gestational Diabetes) होण्याचा धोका वाढतो.
जास्त मीठ टाळा
जास्त मीठ खाल्ल्यास सूज आणि ब्लड प्रेशर वाढू शकतो.
अनपाश्चराइज्ड दूध टाळा
कच्चे दूध किंवा त्यापासून बनवलेले पदार्थ इन्फेक्शनचा धोका वाढवू शकतात.
अल्कोहोल आणि धूम्रपान पूर्णपणे टाळा
हे बाळाच्या विकासासाठी अत्यंत हानिकारक असते.
डॉक्टरांचा सल्ला आवश्यक
प्रत्येक स्त्रीची प्रकृती वेगळी असते, त्यामुळे आहाराबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.