अरुण पाटील
अक्रोड : अक्रोड हा सुका मेवा मेंदूसाठी सर्वात फायदेशीर मानला जातो.
हळद : हळदीमध्ये मेंदूमध्ये येणारी सूज कमी करते आणि नवीन मेंदूच्या पेशी तयार करण्यास मदत करते.
डार्क चॉकलेट : डार्क चॉकलेटमध्ये कोको फ्लेव्होनॉईडस्, कॅफिन आणि अँटिऑक्सिडंटस् असतात.
बदाम : बदाम स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवण्यासाठी फायदेशीर आहेत. ते व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियमचा एक चांगला स्रोत आहेत.
ब्ल्यूबेरी : सेवनाने स्मरणशक्ती सुधारण्यास आणि वयानुसार येणारी मानसिक कमजोरी टाळण्यास मदत होते.
हिरव्या पालेभाज्या : हिरव्या पालेभाज्यांमध्ये असलेले पोषक तत्त्व स्मरणशक्ती तीक्ष्ण करतात आणि मानसिक कमजोरी दूर करतात.
अंडी : आपल्याला लहानपणापासून सांगितले जाते की अंडी खाल्लायने मेंदू तीक्ष्ण होतो. त्यामुळे दररोज किमान एक अंडे खाणे आवश्यक आहे.
फॅटी मासे : आठवड्यातून दोन वेळा अशा माशांचे सेवन केल्यावर मेंदूचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते, असे तज्ज्ञ सांगतात.
कॉफी प्या : दररोज कॉफी पिल्याने तुमची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होईल. कॉफी मध्ये दोन मुख्य घटक कैफिन आणि अँटिऑक्सिडंट असतात. जे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करतात.
दही : दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात, जे आतड्यांतील आरोग्यासाठी आणि मेंदूच्या कार्यासाठी फायदेशीर असतात.