पुढारी वृत्तसेवा
तुळशीचे रोप हे घरासमोर असणे हे शुभ मानले जाते. तुळस धार्मिकदृष्ट्याच नाही तर हवाही शुद्ध ठेवते.
जागेअभावी तुळशीचे रोप कुंडीत लावले जाते. काळजी घेऊनही ते कोमेजून जाते. त्याच्या योग्य वाढीसाठी काही घरगुती उपाय करता येतील.
तुळस कुंडीत लावताना चांगल्या प्रतीची पोषक तत्व असलेली माती वापरावी. तुळशीच्या रोपाची वाढ चांगली होण्यासाठी काही दिवसांनी शेणखत घालणेही गरजेचे आहे. यामुळे चांगली पोषकतत्वे मिळतील.
केळाच्या सालीचे लहान तुकडे करून ते मातीत मिसळावेत यात पोषक घटक असतात. वापरलेली चहा पावडर सुकवूनही मातीत मिसळल्याने होतो फायदा.
तुळशीच्या रोपाची चांगली वाढ होण्यासाठी मुबलक सूर्यप्रकाशाची गरज असते, त्यामुळे कुंडी सूर्यप्रकाशात राहील याची काळजी घ्यावी.
आवश्यकतेपेक्षा अधिक पाणीही तुळशीच्या रोपाच्या वाढीवर परिणाम करते. त्यामुळे योग्य प्रमाणातच पाणी द्यावे.
तुळशीची वाळलेली पाणे वेळोवेळी काढून टाकावीत यामुळे किडीला अटकाव होतो. नवी पाणी जोमात वाढतात.
नारळाच्या शेंड्यांच्या काथ्या जाळून त्याची राख मातीत मिसळल्यास तुळशीच्या पानांची वाढ चांगली होते.