Flat Tummy : पोटाची चरबी होईल झटपट गायब! शिल्पा शेट्टीने सांगितले ५ जादुई योगासनं

पुढारी वृत्तसेवा

फिटनेस आयकॉन शिल्पा शेट्टीने पोटाची चरबी कमी करण्यासाठी ५ सोपी आणि प्रभावी योगासने सांगितली आहेत.

दोन्ही पायांवर शरीराचा तोल समान ठेवून सरळ उभे राहा. हाताची बोटे गुंफून तळवे वरच्या दिशेने करा.

पायाच्या टाचा वर उचलून चवड्यांवर उभे राहा आणि संपूर्ण शरीर वर ओढा. २०-३० सेकंद तोल सांभाळा; यामुळे संपूर्ण शरीराला चांगला ताण मिळतो.

पाठीवर झोपून श्वास घेत डोके, छाती आणि पाय ३० ते ४५ अंशांच्या कोनात वर उचला. शरीराचा भार नितंबांवर ठेवून 'बोटी'चा आकार बनवा.

१५ ते ३० सेकंद या पोझमध्ये राहिल्याने पोटाचे कोर स्नायू मजबूत होतात आणि बेली फॅट वेगाने वितळण्यास मदत होते.

पोटावर झोपून पाय दुमडा आणि हातांनी घोटे पकडा. श्वास घेत छाती आणि मांड्या वर उचलून शरीराचा 'धनुष्यासारखा' आकार तयार करा.

पोटावर झोपून हात खांद्यांजवळ ठेवा. श्वास घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचला. यामुळे पोटाच्या स्नायूंवर चांगला ताण येतो आणि चरबी घटते.

पाठीवर झोपून गुडघे छातीजवळ आणा, हातांनी घट्ट पकडा आणि नाक गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. हे पोटातील गॅस आणि ब्लोटिंग कमी करण्यासाठी उत्तम आहे.

दररोज या ५ आसनांचा सराव करा आणि शिल्पासारखे आकर्षक, फ्लॅट पोट अगदी नैसर्गिकरीत्या मिळवा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.