Fitness : नेहमीकरीता फिट राहायचंय का ? तर करा 'हे' घरगुती उपाय !

अंजली राऊत

रोज सकाळी लवकर उठा, लवकर उठल्याने शरीर आणि मन दोन्ही ताजे राहते

उठल्यानंतर कोमट पाणी प्या, त्यामुळे शरीर डिटॉक्स होऊन पचन सुधारतं

भिजवलेले सुकामेवा खा, बदाम, काजू, हरभरा, खासकरुन हिरवे मूग भिजवून खा, प्रथिने, फायबर आणि ताकद वाढवण्यासाठी ते उपयोगी आहे

स्नॅकसाठी योग्य आणि झपाट्याने ऊर्जा मिळवणारा पर्याय म्हणजे रोज केळी खाणे होय

रोज दूध प्या, त्यामुळे हाडं मजबूत होतात आणि शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी मदत होते

रोज किमान तासभर हलका व्यायाम करा, त्यामुळे वजन नियंत्रणात राहून हृदय आणि मेंदूसाठी फायदेशीर ठरते

प्रथिनेयुक्त आहार घ्या डाळ, अंडी, (शाकाहारसाठी हिरवे मूग भिजवून खा) दूध, कडधान्यं खा. ही प्रथिने शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी उपयोगी आहे

संपूर्ण दिवसभरातून किमान 3-4 लिटर पाणी प्या, त्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि आजार दूर पळतात

रोजची कमीत कमी 7 ते 8 तास झोप होणे गरजेचे आहे, त्यामुळे शरीर आणि मेंदू दोघांनाही रीफ्रेश होण्यासाठी मदत होते

Roasted peanuts : कर्करोगासारख्या आजारांमध्ये भाजलेले शेंगदाणे देतात आश्चर्यकारक फायदे
Roasted peanuts : कर्करोगासारख्या आजारामध्ये भाजलेले शेंगदाणे देतात आश्चर्यकारक फायदे