Finger Lime | हे लिंबू असतात 25000 रुपये किलो इतके महाग, लक्झरी फ्रूट म्हणून जगभरात मागणी

Namdev Gharal

या लिंबूचे नाव आहे Finger Lime (फिंगर लाइम) यालाच 'Citrus Caviar' असेही म्हणतात आणि हे जगातील सर्वात महागडे लिंबू वर्गीय फळ आहे

हा लिंबू कापल्यावर कॅव्हियार या माशांच्या महागड्या अंड्यासारखेच यातून बाहेर छोटे दाणे बाहेर पडतात तसेच याची चव अतिशय उत्‍कृष्ट असते

साधारण लिंबू 5 ते 10 रुपयांपर्यंत मिळतो पण फिंगर लाइमची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत साधारणपणे २०० ते ३०० डॉलर्स प्रति किलो (सुमारे १७,००० ते २५,००० भारतीय रुपये) पर्यंत असू शकते.

भारतातही याची आयात होते. हे मूळचे ऑस्ट्रेलियातील पावसाळी जंगलांमधील फळ आहे. याची शेती करणे कठीण असून उत्पादन खूप कमी मिळते त्‍यामुळे हे दुर्मिळ आहे

मोठ्या हॉटेल्समध्ये सजावटीसाठी आणि खास चवीसाठी याची मोठी मागणी असते. हे दिसायला एखाद्या बोटासारखे लांबट असते, म्हणून याला 'फिंगर लेमन' म्हणतात.

याचे बाहेरील आवरण हिरवे, काळे, जांभळे किंवा गडद लाल असू शकते. आतील दाणे पांढरे, गुलाबी किंवा फिकट हिरवे असतात.

याची चव लिंबू आणि लेमनग्रास यांच्या मिश्रणासारखी असते. जेव्हा तुम्ही हे दाणे दाताखाली चावता, तेव्हा ते तोंडात फुटतात आणि लिंबाचा ताजा स्वाद देतात.

प्रामुख्याने सी-फूड (Seafood), सुशी, सॅलड आणि डेझर्ट्स सजवण्यासाठी याचा वापर होतो.महागड्या पेयांमध्ये (Drinks) एक वेगळा लूक आणि चव देण्यासाठी हे वापरले जाते.