Saving Tips | खिशात पैसे टिकत नाहीत? अर्थतज्ज्ञ सुचवतात या 5 खास टिप्स!

Namdev Gharal

सध्याच्या महागाईच्या जमान्यात जिवनावश्यक बाबींसाठी खर्चाचे प्रमाण वाढले आहे. नोकरदार, कमावणाऱ्या व्यक्तिला खर्चाचा ताळमेळ घालताना नाकी नऊ येतात

आर्थिक नियोजनाच्या काही बाबी कटाक्षाने पाळल्या तर तुमचे महिन्याच्या बजेटचे योग्य नियोजन करता येईल. यामुळे खिशात पैसा टिकत नाहीय? असे वारंवार होणे कमी होईल

नियम १ - ५०/३०/२० चा फॉर्म्युला : अर्थतज्ज्ञ सांगतात की तुमच्या उत्पन्नाचे ५०%, ३०% आणि २०% असे विभाजन करा. ५०%: अन्न, घरभाडे, बिलं (गरजा) ३०%: फिरणे, शॉपिंग, छंद (इच्छा) २०%: बचत आणि गुंतवणूक

नियम २ - पगार होताच आधी 'बचत' - यामध्ये उत्पन्न - खर्च = बचत अशी पद्धत न वापरता उत्पन्न - बचत = खर्च अशी पद्धत वापरा

पगार जमा होताच आधी २०% रक्कम दुसऱ्या खात्यात किंवा SIP मध्ये ट्रान्सफर (Auto-Debit) करा.

नियम ३ - २४ तासांचा नियम

ऑनलाईन शॉपिंग करताना किंवा एखादी महागडी गोष्ट आवडल्यास ती लगेच खरेदी करू नका. २४ तास थांबा. २४ तासांनंतरही ती गोष्ट खरोखर गरजेची वाटली, तरच खरेदी करा. यामुळे अनावश्यक खर्च टळतो.

नियम ४ - लहान-लहान खर्चांचा हिशोब

'लहान गळती' रोखा: रोजचा चहा-नाश्ता, अनावश्यक ओटीटी (OTT) सबस्क्रिप्शन किंवा युपीआय (UPI) वरून होणारे १०-५० रुपयांचे लहान खर्च महिन्या शेवटी मोठी रक्कम बनतात. यासाठी मोबाईल ॲप वापरा

नियम ५ - आणीबाणी निधी बनवा (Emergency Fund)अचानक येणाऱ्या खर्चाचे नियोजन: आजारी पडणे किंवा अचानक मोठे काम निघाल्यास पैशांची चणचण भासते.

किमान ३ ते ६ महिन्यांच्या खर्चाएवढी रक्कम आणीबाणी निधी (Emergency Fund) म्हणून बाजूला ठेवा.

बचत ही एका दिवसात होत नाही, तर ती एक शिस्त आहे! या गोष्टी पाळल्यास तुमच्या खर्चाचा आणि उत्‍पनाचा ताळमेळ बसू शकतो.