पुढारी वृत्तसेवा
आठवड्याची सुरुवात बोअर वाटतेय? या सोप्या स्टेप्स तुमचा दिवस बदलून टाकतील!
केवळ वीकेंडसाठी जगू नका, आठवड्याचे सर्व दिवस मोजा सोमवारसुद्धा एन्जॉय करता येतो!
पार्टी करणार असाल तर शुक्रवार किंवा शनिवारी रात्री करा आणि रविवारी विश्रांती, असे बॅलन्स ठेवा, सोमवार शांत जाईल.
शनिवार-रविवारची सकाळ म्हणजे जणू झोपेचा उत्सवच! पण खूप उशीरापर्यंत झोपलात तर सोमवार अधिकच त्रासदायक वाटेल.
सोमवारी सकाळी काय घालायचं, डब्यात काय न्यायचं हे रविवारीच ठरवा. सकाळी गोंधळ टाळल्यास सोमवार अधिक चांगला जाईल.
कामाच्या आठवड्यासाठी शरीर आणि मन सज्ज ठेवण्यासाठी ७ ते ९ तासांची झोप आवश्यक आहे, त्यासाठी लवकर झोपा.
स्वतःसाठी वेळ मिळवा, दिवसाची सुरुवात शांतपणे करा.
नवा ड्रेस असेल तर सोमवारीच घाला. काही अभ्यास सांगतात की, ऑफिसमध्ये जाताना लाल रंगाचे कपडे परिधान केल्याने आत्मविश्वास वाढतो.
सोमवार खास वाटण्यासाठी एखादी गोष्ट स्वतःसाठी ठेवा. एक छोटंसं चॉकलेट किंवा लंच ब्रेकमध्ये आवडता पदार्थ.
हसऱ्या चेहऱ्यामुळे लोक जवळ येतात, संवाद वाढतो आणि ऑफिसचं वातावरण हलकं होतं. तुम्ही जर सोमवारच्या दिवशी इतरांना हसवलंत, तर तुमच्याकडेही पॉझिटिव्ह एनर्जी परत येते.