Health Tips for Liver: यकृतातील चरबी कमी करण्यासाठी ५ भाज्या

पुढारी वृत्तसेवा

यकृतातील चरबी ही आजारपणाची एक सामान्य अवस्था आहे आणि जगभरातील हजारो लोक त्याने त्रस्त आहेत.

औषधोपचारांबरोबरच विशिष्ट भाज्यांमध्ये असे पोषक घटक असतात जे यकृताचे आरोग्य जपतात, चरबीचा संचय कमी करतात आणि यकृताचे झालेले नुकसान पूर्ववत करतात.

संतुलित आहारात या भाज्यांचा नियमित समावेश केल्यास नैसर्गिक पद्धतीने लिव्हरची कार्यक्षमता सुधारता येते.

ब्रोकोली

ब्रोकोली मध्ये दोन महत्त्वाचे घटक - फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स असल्यामुळे यकृताला याचा फायदा होतो.

Broccoli

पालक

पालकामध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे (व्हिटॅमिन्स) आणि खनिजे (मिनरल्स) असल्याने ते जळजळ (inflammation) आणि ऑक्सिडेटिव्ह तणावाशी (oxidative stress) लढतात, ज्यामुळे यकृताला फायदा होतो.

Spinach

कारले

कारल्याचे सेवन रक्तातील साखर आणि चरबीचे प्रमाण नियंत्रित करते, ज्यामुळे यकृतावरचा ताण कमी होतो. यात असलेल्या कडू घटकांमुळे इन्सुलिन संवेदनशीलता वाढते आणि खराब कोलेस्टेरॉल कमी होते.

Bitter Gourd / Karela

केल (Kale)

केल ही एक पोषक-समृद्ध पालेभाजी आहे ज्यात अँटिऑक्सिडंट्स, फायबर आणि जीवनसत्त्वे ए, सी आणि के असतात. केलमधील अँटिऑक्सिडंट्स जळजळ कमी करण्याचे कार्य करतात, तर यकृत त्यांचा उपयोग विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी करते.

जलपालक किंवा कंग काँग (Water Spinach)

जलपालक (कंग काँग) मध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात जी कोलेस्टेरॉल कमी करतात आणि टॉक्सिन्स बाहेर काढून यकृत मजबूत करतात. नियमित सेवनाने यकृतातील चरबीचा साठा कमी होतो.

Water Spinach