रणजित गायकवाड
युवराज सिंग आणि त्याचे वडील जोगराज सिंग दोघेही भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत.
जोगराज यांनी भारतासाठी फक्त 1 कसोटी आणि 6 वनडे सामने खेळले.
योगराज सिंग यांचा मुलगा युवराज सिंगने भारतासाठी 402 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. ज्यात त्याने 11778 धावा केल्या. या दरम्यान युवीने 148 विकेट्सही घेतल्या.
2011 च्या वनडे वर्ल्डकपमध्ये त्याने 362 धावा केल्या. तर 15 विकेट्सही घेतल्या. त्याने प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार पटकावला.
सुनील गावस्कर आणि त्यांचा मुलगा रोहन गावस्कर दोघेही भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत.
सुनील गावस्कर हे भारताचे महान फलंदाज मानले जातात. कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावांचा टप्पा गाठणारा ते पहिले फलंदाज आहेत.
त्यांनी भारतासाठी एकूण 233 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. पण त्यांचा मुलगा रोहन भारतासाठी फक्त 11 एकदिवसीय सामने खेळू शकला.
लाला अमरनाथ आणि मोहिंदर अमरनाथ यांनीही भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे. लाला यांनी भारतासाठी 24 आंतरराष्ट्रीय सामने खेळले.
तर मोहिंदर यांनी कसोटी, वनडे फॉरमॅटमध्ये भारतासाठी एकूण 127 सामने खेळले. यात त्यांनी 6302 धावा केल्या आणि ७८ विकेट घेतल्या.
स्टुअर्ट बिन्नी आणि रॉजर बिन्नी यांनीही भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे. रॉजर सध्या बीसीसीआयचे प्रमुख आहेत.
रॉजर यांनी भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 99 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांनी 124 विकेट्स घेतल्या असून 1459 धावाही केल्या आहेत.
तर स्टुअर्ट बिन्नीने भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 23 सामने खेळले.