Namdev Gharal
सध्या उन्हाळा असल्याने फॅनशिवाय घरात बसताही येणार नाही, पण काहीवेळा फुल स्पिडवरही हवा मिळत नाही. त्यामुळे फॅनच्या मेंटन्ससकडे लक्ष देणे गरजेचे असते
फॅनच्या पात्यांच्या कडांवर जेव्हा धुळीची जाड रेघ दिसायला लागते, तेव्हा फॅन साफ करण्याची गरज असते. या धुळीमुळे फॅन हवा फेकतो
हवेचा वेग कमी वाटणे: फॅन फुल स्पीडवर असूनही नेहमीसारखी हवा लागत नसेल, तर समजून जावे की धुळीने हवेचा रोध वाढवला आहे.
पात्यांवर धूळ साचल्याने त्यांचा गुळगुळीतपणा संपतो आणि पृष्ठभाग खडबडीत होतो. यामुळे पाते हवेला व्यवस्थित कापू शकत नाहीत आणि हवेचा वेग मंदावतो.
जेव्हा तुम्ही फॅनची पाते साफ करता, तेव्हा ती पुन्हा हलकी आणि गुळगुळीत होतात. यामुळे फॅन कमी वेगातही पूर्वीपेक्षा जास्त आणि थंड हवा द्यायला लागतो.
धुळीमुळे फॅन जड होतो आणि मोटरला फिरायला जास्त ताण पडतो. फॅन साफ केल्यावर मोटरवरचा भार कमी होतो, ती फास्ट फिरते व हवाही चांगली मिळते
स्वच्छ केलेला फॅन ३ किंवा ४ च्या स्पीडवरही ५ एवढी हवा देतो. जेव्हा तुम्ही फॅन कमी नंबरवर चालवता, तेव्हा साहजिकच विजेची मोठी बचत होते.
नियमित साफसफाईमुळे फॅनच्या मोटरवर ताण येत नाही. यामुळे फॅन खराब होण्याचा धोका टळतो आणि मेंटेनन्सचा खर्चही वाचतो. हवाही योग्य प्रमाणात मिळते
फॅन साफ केल्यावर पात्यांवर कार वॉक्स (Car Wax) किंवा हेअर कंडिशनरचा अगदी पातळ थर लावा. यामुळे पात्यांवर धूळ लवकर जमा होत नाही!
पाती साफ करण्यासाठी छोटी ट्रिक म्हणजे एका टबमध्ये कोमट पाणी घेऊन त्यात थोडे लिक्विड सोप किंवा शॅम्पू टाका.यात फॅनची पाते आणि दोन्ही जाळ्या ५ मिनिटे भिजत ठेवा. यामुळे चिकटलेली धूळ मऊ होईल.
दर १५ ते ३० दिवसांनी टेबल फॅन नक्की साफ करणे फायद्याचे ठरते, यामुळे हवाही चांगली मिळते तसेच विज बिलातही बचत होते