Foot Care Tips: १० मिनिटांत पाय होतील गोरे! वापरा ‘हा’ घरगुती फॉर्म्युला

पुढारी वृत्तसेवा

पायांची काळजी घेण्यासाठी आणि त्यांना सुंदर व चमकदार बनवण्यासाठी सोप्या घरगुती उपायांचा वापर करता येऊ शकतो.

केवळ १० मिनिटांत पाय गोरे व आकर्षक बनवण्यासाठी खालील ३ सोप्या स्टेप्स नियमितपणे वापरून पाहू शकता

हे नैसर्गिक उपाय आठवड्यातून दोनदा केल्यास पायांवरील काळसरपणा कमी होऊन ते सुंदर राहतील.

प्रथम, लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा कोमट पाण्यात मिसळा. या पाण्यात तुमचे पाय अर्धा तास भिजवा आणि नंतर ते स्वच्छ घासून स्वच्छ करा.

२ चमचे बेसन आणि चिमूटभर हळद, दूध आणि गुलाबजल मिसळून पेस्ट बनवा. हे तुमच्या पायांना लावा आणि १० मिनिटे तसेच राहू द्या. नंतर, ते स्वच्छ घासून घ्या.

खोबरेल तेल आणि मीठ मिसळून स्क्रब बनवा आणि त्याने तुमचे पाय घासा. त्यानंतर, गुलाबजल आणि कोरफडीच्या जेलने तुमचे पाय मसाज करा.

तिन्ही स्टेप्स पूर्ण झाल्यावर पाय टॉवेलने पुसून घ्या. पाय पूर्णपणे वाळल्यावर त्यावर मॉइश्चरायझर लावा.

या उपायाने आपले पाय लगेच स्वच्छ, चमकदार आणि आकर्षक दिसू लागतील.