पुढारी वृत्तसेवा
वाढते वय आणि ताणतणावामुळे चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या घालवण्यासाठी आता महागड्या ब्युटी प्रोडक्ट्सची किंवा पार्लरमधील महागड्या ट्रिटमेंट्सची गरज भासणार नाही.
सध्या 'फेस योगा' हा प्रकार वेगाने लोकप्रिय होत असून, त्याद्वारे तुम्ही घरी बसल्या नैसर्गिकरित्या चमकदार त्वचा मिळवू शकता. कसा करावा सराव ते जाणून घ्या.
१. फिश फेस
आपले दोन्ही गाल आतल्या बाजूला खेचा, जेणेकरून तुमचा चेहरा माशासारखा दिसेल. ही स्थिती १० सेकंद टिकवून ठेवा. यामुळे गालांचे स्नायू टोन होतात.
२. आय लिफ्ट
तुमच्या भुवया वरच्या दिशेला उचलून धरा आणि १५ सेकंद तसेच राहा. यामुळे डोळ्यांच्या आजूबाजूच्या स्नायूंची हालचाल वाढून थकवा दूर होतो.
३. नेक स्ट्रेच
चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी, ताणाच्या रेषा कमी करण्यासाठी आणि सुरकुत्यांपासून आराम मिळवण्यासाठी नियमित मान स्ट्रेचिंग करा. यासाठी मान मागे झुकवून वर पाहा.
फेस योगाचे फायदे
रक्तभिसरण सुधारते, सुरकुत्यांपासून मुक्ती, हनुवटीखालील साठलेली चरबी कमी होण्यास मदत होते.
काय काळजी घ्याल?
फेस योगा करताना चेहऱ्यावर खूप जास्त दबाव देऊ नका. सातत्य आवश्यक आहे. जर तुम्हाला त्वचेच्या समस्या असतील, तर तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच हा सराव सुरू करावा.