पुढारी वृत्तसेवा
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, रोज दहा हजार पावले चालण्याचे अनेक फायदे आहेत.
नियमित चालण्यामुळे रक्ताभिसरण सुधारते, रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.
दररोज 10,000 पावले चालल्याने सुमारे 300 ते 500 कॅलरीज जळतात.
ज्यामुळे वजन कमी करण्यास किंवा टिकवून ठेवण्यास मदत होते.
चालण्यामुळे शरीरात ‘एंडोर्फिन’सारखी आनंदी संप्रेरके तयार होतात.
ज्यामुळे ताण, चिंता आणि नैराश्य कमी होते.
चालण्यामुळे सांध्यांची लवचिकता वाढते आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होतो.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी चालणे हे इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारण्यास मदत करते.