महाग सफरचंद की स्वस्त पेरू? आरोग्यासाठी कोणते फळ उत्तम?

पुढारी वृत्तसेवा

रोज सफरचंद खाण्यापूर्वी हे जाणून घ्या!

सफरचंदापेक्षा स्वस्त आणि सहज उपलब्ध असलेल्या पेरूमध्येही अनेक महत्त्वाचे पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात.

सफरचंद की पेरू? पोषणमूल्याची तुलना

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनच्या इंडियन फूड कॉम्पोझिशन टेबलनुसार सफरचंद आणि पेरूच्या पोषणमूल्यात लक्षणीय फरक दिसतो.

कॅलरीच्या बाबतीत सफरचंद पुढे

वजन कमी करण्यासाठी कॅलरीकडे लक्ष देत असाल तर सफरचंद हा तुलनेने कमी कॅलरीचा पर्याय आहे. १०० ग्रॅम सफरचंदात सुमारे ५२ कॅलरी, तर पेरूमध्ये सुमारे ६८ कॅलरी असतात.

प्रोटीनसाठी पेरू ठरतो फायदेशीर

प्रोटीनच्या बाबतीत पेरू सफरचंदापेक्षा खूप पुढे आहे. १०० ग्रॅम सफरचंदात सुमारे ०.३ ग्रॅम प्रोटीन, तर पेरूमध्ये सुमारे २.६ ग्रॅम प्रोटीन मिळते.

व्हिटॅमिन सी मध्ये पेरूची बाजी

व्हिटॅमिन सी च्या बाबतीत पेरूमध्ये मोठी आघाडी आहे. १०० ग्रॅम सफरचंदात सुमारे ५ मिग्रॅम, तर पेरूमध्ये सुमारे २२० मिग्रॅम व्हिटॅमिन सी असल्याचे नमूद आहे.

रोगप्रतिकारक शक्तीसाठी पेरू

व्हिटॅमिन सी शरीराच्या रोगप्रतिकारक कार्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे आहारात व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत हवा असेल तर पेरू हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

फायबरसाठीही पेरू भारी!

पचनक्रिया आणि नियमित शौचासाठी आहारातील फायबर महत्त्वाचे असते. १०० ग्रॅम सफरचंदात सुमारे २.४ ग्रॅम फायबर, तर पेरूमध्ये सुमारे ५.४ ग्रॅम फायबर मिळते.

बजेटमध्येही पेरू फायदेशीर

सफरचंदाची किंमत अनेकदा तुलनेने जास्त असते. त्याच्या तुलनेत पेरू सहज उपलब्ध आणि स्वस्त असू शकतो. त्यामुळे कमी बजेटमध्येही पोषक फळ आहारात समाविष्ट होते.

मग सफरचंद खायचे की पेरू?

दोन्ही फळे पौष्टिक आहेत. मात्र प्रोटीन, फायबर आणि व्हिटॅमिन सी यांसारख्या काही पोषक घटकांसाठी पेरू अधिक फायदेशीर ठरू शकतो.