Depression Treatment |डिप्रेशनवर व्यायामही ठरतो प्रभावी! जाणून घ्‍या नवीन संशोधन

पुढारी वृत्तसेवा

नैराश्य (डिप्रेशन) दूर करण्यासाठी व्यायाम हा मानसोपचारांइतकाच प्रभावी ठरू शकतो, असे एका नवीन संशोधनातून समोर आले आहे.

'कोक्रेन रिव्ह्यू'ने (Cochrane Review) प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, डिप्रेशनची लक्षणे कमी करण्यासाठी व्यायामाचा उपयोग हा इतर मुख्य उपचारांइतकाच परिणामकारक ठरतो.

संशोधकांनी सुमारे ५,००० प्रौढांचा समावेश असलेल्या ७३ चाचण्यांचा अभ्यास केला. व्यायाम हा कमी खर्चात उपलब्ध असलेला पर्याय असल्याने, मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी तो एक उत्तम मार्ग असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

अभ्यासात असे दिसून आले की, जेव्हा व्यायामाची तुलना क्लिनिकल मानसोपचारांशी (Therapy) करण्यात आली, तेव्हा दोन्हीचे परिणाम सारखेच दिसून आले.

अँटी-डिप्रेसंट औषधांच्या तुलनेत व्यायामाचा परिणाम होतो का, याबाबतचे पुरावे अद्याप पूर्णतः स्पष्ट नसले तरी, तो सकारात्मक असल्याचे प्राथमिक संकेत मिळाले आहेत.

नियमित शारीरिक हालचालींमुळे डिप्रेशनचा धोका १७ टक्क्यांनी कमी होऊ शकतो. याउलट, बैठी जीवनशैली असलेल्या व्यक्तींमध्ये डिप्रेशन उद्भवण्याची शक्यता ६४ टक्क्यांनी जास्त असते.

२०२४ मधील एका अभ्‍यासानुसार, व्यायामामुळे शरीरातील दाह कमी होतो, शरीराचे जैविक घड्याळ सुस्थितीत राहते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते. या तिन्ही गोष्टींचा थेट संबंध मानसिक आरोग्याशी असतो.

तज्ज्ञांच्या मते, व्यायामाचा प्रकार कोणताही असो; मग ते दररोज ३० मिनिटांचे चालणेअसो, डान्स, बागकाम किंवा योगासने दररोज केवळ देखील मनःस्थिती (Mood) सुधारण्यासाठी पुरेसे ठरते. मात्र यामध्‍ये सातत्‍य आवश्‍यक आहे.

येथे क्‍लिक करा.