इथेनॉल E20 पेट्रोलमुळे गाड्यांवर काय परिणाम होतो? सरकारकडून मोठं स्पष्टीकरण

मोहन कारंडे

इथेनॉल पेट्रोल : गाडीसाठी वरदान की शाप? तुमच्या मनातही हाच प्रश्न आहे का? जाणून घ्या खरं काय आहे!

Ethanol Blend Fuel

देशभरात E20 (20% इथेनॉल) पेट्रोल मिळायला सुरुवात झाली आहे. पण अनेक वाहनचालकांना भीती वाटतेय की, यामुळे गाडीचं इंजिन खराब होतंय आणि मायलेजही घटलंय. 

Ethanol Blend Fuel

पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केलंय की, या सर्व चिंता निराधार आहेत. या दाव्यांना कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही.

Ethanol Blend Fuel

सरकारने सांगितलं की, मायलेजमध्ये फक्त ३ ते ६ टक्क्यांची घट होते. नवीन गाड्यांमध्ये तर ही घट फक्त १-२ टक्के आहे.

Ethanol Blend Fuel

ARAI, IIP आणि IOCL सारख्या संस्थांनी केलेल्या चाचण्यांमध्ये जुन्या वाहनांवरही कोणतेही मोठे वाईट परिणाम दिसून आलेले नाहीत.

Ethanol Blend Fuel

काही जुन्या वाहनांमध्ये 20-30 हजार किमी नंतर रबरचे काही पार्ट्स बदलावे लागतील, पण तेही स्वस्त आहेत.

Ethanol Blend Fuel

मंत्रालयाने पुढे म्हटले की, E20-अनुरूप वाहने एप्रिल २०२३ पासून उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे, E20 मुळे इंधन कार्यक्षमतेत मोठी घट होते हा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे.

Ethanol Blend Fuel

इथेनॉल पेट्रोलमुळे प्रदूषण कमी होतं. पेट्रोलच्या तुलनेत कार्बन उत्सर्जन ६५% पर्यंत कमी होऊ शकतं.

Ethanol Blend Fuel

यामुळे परदेशातून पेट्रोल आयात करण्यावरचा खर्च कमी होतो. देशाचे कोट्यवधी रुपये वाचतात.

Ethanol Blend Fuel

इथेनॉलची ऑक्टेन संख्या पेट्रोलपेक्षा जास्त असते. त्यामुळे, इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमध्ये पारंपरिक पेट्रोलपेक्षा जास्त ऑक्टेन संख्या असते.

Ethanol Blend Fuel

आजच्या आधुनिक हाय-कम्प्रेशन रेशो इंजिनसाठी आवश्यक असलेले हाय-ऑक्टेन इंधन पुरवण्यासाठी इथेनॉल एक उत्तम पर्याय ठरतो.

Ethanol Blend Fuel

इथेनॉल फक्त ऊसावर नाही, तर मका, खराब धान्य, शेती अवशेषांपासूनही तयार करता येते, याचा शेतकऱ्यांनाही फायदा होतो.

Ethanol Blend Fuel

सरकारच्या मते, इथेनॉल पेट्रोल सुरक्षित, फायदेशीर आणि भविष्यासाठी गरजेचं आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Ethanol Blend Fuel