त्वचा अन् डोळ्यांच्या आरोग्यासाठी 'हे' जीवनसत्त्व आहे आवश्यक...; कसे मिळवाल?

पुढारी वृत्तसेवा

आरोग्याचा खजिना

निरोगी त्वचा आणि सुस्पष्ट दृष्टीसाठी 'व्हिटॅमिन ए' हे शरीरासाठी अत्यंत आवश्यक पोषक तत्व मानले जाते.

डोळ्यांचे रक्षण

व्हिटॅमिन ए मुळे रातांधळेपणाचा धोका कमी होतो आणि वाढत्या वयातही दृष्टी तीक्ष्ण राहण्यास मदत होते.

Eye health | Pudhari canva

ग्लोइंग स्किन

त्वचेच्या पेशींच्या नूतनीकरणासाठी हे जीवनसत्त्व मदत करते, ज्यामुळे मुरुमे कमी होतात आणि त्वचा तजेलदार दिसते.

Monsoon Skincare For Oily Skin | Canva

रोगप्रतिकारशक्ती

केवळ सौंदर्यच नाही, तर शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठीही व्हिटॅमिन ए महत्त्वाची भूमिका बजावते.

शाकाहारी स्रोत

गाजर, रताळे, पालक आणि पपई यांसारख्या पदार्थांमधून तुम्हाला नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात मिळते.

मांसाहारी पर्याय

अंडी, मासे आणि दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करून तुम्ही या जीवनसत्त्वाची कमतरता भरून काढू शकता.

vitamin A

वृद्धत्वावर मात

व्हिटॅमिन ए मधील अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेवरील सुरकुत्या रोखण्यास आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यास मदत करतात.

File Photo

तज्ज्ञांचा सल्ला

शरीरात या जीवनसत्त्वाचा समतोल राखण्यासाठी आहारात विविध फळांचा आणि पालेभाज्यांचा नक्की समावेश करा.

pudhari photo
येथे क्लिक करा...