पुढारी वृत्तसेवा
ही एक अंत्यत दुर्मिळ अशी, लहान आकाराची माकडाची प्रजाती आहे
याचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या चेहऱ्यावर असलेल्या भल्यामोठ्या पांढऱ्या मिशा
Emperor Tamarin हे नाव जर्मन साम्राजाच्या शेवटचा एम्परर विल्ह्यम 2 (Wilhelm II) च्या मिशांसारख्या मिशांमुळे पडले आहे.
हे माकड दक्षिण अमेरिकेतील अॅमेझॉन जंगलात, विशेषतः ब्राझिल, पेरु, बालिव्हिया या देशातील वर्षावनातील जंगलात आढळते
याचे हात पाय तांबूस रंगाचे असतात. तोंड गुलाबी रंगाचे असते यावर पांढऱ्या मिशा वेगळ्या दिसतात
याचे शरीर 23-26 सेंटीमीटर लांब, आणि 35-41 सेंटीमीटर लांब शेपटी असते
हे माकड वजनाने खपूच लहान असते, याचे वजन केवळ 500 ग्रॅम इतकेच असते
हे माकड लहान कळपात राहतात खेळकर, सामाजिक आणि उत्साही असतात.
फळे, कीटक, लहान प्राणी, वृक्षांची फुले हा यांचा प्रमूख आहार असतो हे माकड दिवसभर अन्न शोधत फिरतात.