पुढारी वृत्तसेवा
पाणी पिणे शरीरासाठी चांगले असते, पण गरजेपेक्षा जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
खूप जास्त पाणी प्यायल्याने शरीरातील सोडियमची पातळी झपाट्याने कमी होते, ज्याला वैद्यकीय भाषेत 'हायपोनॅट्रेमिया' (Hyponatremia) म्हणतात.
अधिकच्या पाण्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढणाऱ्या तुमच्या किडनीवर (मूत्रपिंड) अतिरिक्त ताण पडतो.
सोडियम कमी झाल्यामुळे शरीरातील पेशींमध्ये, विशेषतः मेंदूच्या पेशींमध्ये सूज येण्याचा धोका निर्माण होतो.
सतत डोकेदुखी, चक्कर येणे, उलट्या होणे किंवा थकवा जाणवणे ही अति-हायड्रेशनची (Overhydration) मुख्य लक्षणे आहेत.
शरीरात पाण्याचे प्रमाण जास्त झाल्यास रक्ताचे प्रमाण वाढते, ज्यामुळे हृदयावर पंपिंग करण्याचा ताण वाढतो.
सामान्यतः एका निरोगी व्यक्तीने दिवसातून २ ते ३ लिटर (८ ते १० ग्लास) पाणी पिणे पुरेसे मानले जाते.
त्यामुळे फक्त छंद म्हणून किंवा अतिउत्साहात प्रमाणाबाहेर पाणी पिणे टाळा आणि तहान लागेल तसेच पाणी प्या!