दुधाला विरजण लावून दही तयार करतात..दही जास्त आंबट होऊ नये म्हणून त्यावर अर्धा कप बर्फाचे पाणी टाकावे व दही फ्रीजमध्ये ठेवावे; यामुळे दही आंबट होत नाही..क्षय, महारोग, सर्दी आणि कफविकाराचा त्रास असणाऱ्यांनी दही खाऊ नये..रात्री दही खाऊ नये; खायचे असल्यास त्यात गाईचे तूप, साखर, मध किंवा आवळाचूर्ण घालून खावे किंवा ते गरम करून तरी घ्यावे..मात्र, पाणी व साखर टाकून रात्री दही घेण्यास हरकत नाही..दही हा नेहमी आहारात घेण्याचा पदार्थ नाही. शरद व वसंत ऋतूत कधीही दही घेऊ नये..दह्याचे नित्य सेवन केल्याने रक्त बिघडून कुष्ठासारखे विकार होण्याची शक्यता असते..औषधात दही घ्यायचे असल्यास, विरजण लावल्यापासून २४ तासांनी तयार झालेले घट्ट दहीच वापरावे..अदमुरे दही अतिशय दोषकारक असते. ज्या दह्याला आंबटपणा आलेला नाही आणि ते गोडच आहे, असे दही निरनिराळे रोग निर्माण करते.