पुढारी वृत्तसेवा
लहान मुल जर बोलू शकत नसेल तर घरच्यांना काळजी वाटू लागते.
मुल जर उशिरा बोलत असेल, तर पोपटाने खाल्लेला पेरू मुलाला खायला दिल्याने मुल बोलू लागते असा समज आहे.
मुलांच्या बोलण्याशी किंवा भाषेच्या विकासाशी याचा काहीही संबंध नसतो.
मुलांचा आवाज किंवा भाषा ही त्यांच्या मेंदूचा विकास, सराव आणि सामाजिक वातावरणावर अवलंबून असते.
पोपट पेरू खाताना त्यातील बिया आणि गोड गर चोच मारून खातो. त्यामध्ये कोणतेही औषधी गुण नसतात जे मुलांची भाषा सुधारू शकतील.
मुलांचा भाषेचा विकास करण्यासाठी मुलांशी नेहमी स्पष्ट आणि सोप्या भाषेत संवाद साधावा.
त्यांना गोष्टी सांगणे, गाणी ऐकवणे किंवा नवनवीन शब्द शिकवणे यामुळे त्यांची शब्दसंपत्ती वाढते.
जर मूल उशिरा बोलत असेल, तर एखाद्या बालरोगतज्ज्ञ किंवा स्पीच थेरपिस्टचा सल्ला घेणे योग्य ठरेल.
मुलांच्या सर्वांगिण वाढीसाठी ऐकिव माहितीवर विश्वास न ठेवता तज्ञांचा सल्ला घेणे उत्तम.