पुढारी वृत्तसेवा
मऊ, सुंदर, सतेज आणि तरुण त्वचेसाठीही नियमित एक एव्होकॅडो खाणे फायदेशीर ठरू शकते , असे आहारतज्ज्ञ सांगतात.
हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार, एव्होकॅडोमधील हेल्दी फॅट्स, व्हिटॅमिन आणि खनिजे त्वचेसाठी नैसर्गिक टॉनिकप्रमाणे काम करतात.
या फळामुळे त्वचेला आतील बाजूने पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो.
एव्होकॅडोमध्ये व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते. या दोन्ही व्हिटॅमिन्समुळे त्वचेला ओलावा मिळतो.
कोरड्या त्वचेची समस्या दूर होण्यास मदत मिळते.
एव्होकॅडोतील अँटी-ऑक्सिडंटस् आणि फॅटी अॅसिडमुळे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण होण्यास मदत मिळते.
सूर्याच्या अतिनील किरणांमुळे आणि फ्री रॅडिकल्समुळे त्वचेचे झालेले नुकसान भरून निघण्यास मदत मिळते, ज्यामुळे अकाली वृद्धत्वाची लक्षणे टाळता येतात.
एव्होकॅडोतील पोषणतत्त्वांमुळे चेहर्यावरील सुरकुत्या हळूहळू कमी होण्यास मदत मिळते.
एव्होकॅडोमध्ये अँटी-मायक्रोबियल गुणधर्मांचा समावेश आहे, यामुळे पिंपल्सच्या समस्येतून सुटका मिळू शकते.
एव्होकॅडोच्या तेलानेही चेहरा स्वच्छ केल्यास त्वचा मऊ आणि हायड्रेट राहण्यास मदत मिळते.