पुढारी वृत्तसेवा
दही-भात विशेषत दक्षिण भारतात अधिक लोकप्रिय आहे.
चवदार आणि थंड दही-भात आरोग्यासाठी लाभदायकही असतो.
तज्ज्ञांच्या मते, रोज दुपारच्या जेवणात काही प्रमाणात दही खायला हवे. त्याने आपल्याला अँटिऑक्सिडंट, प्रॉबायोटिक्स आणि गुड फॅट मिळतील.
हे केवळ पोटासाठी नव्हे तर त्याने मानसिक आरोग्यही सुधारते आणि वजन नियंत्रित राहते.
ताण जाणवत असल्यास किंवा मळमळ होत असल्यास दही- भाताचे सेवन करायला हवे. यामुळे अनेक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते.
तिखट खाण्याचे शौकीन असल्यास तिखट पदार्थ खाल्ल्यानंतर दही-भाताचे सेवन केल्यास काहीही नुकसान होणार नाही.
साध्या दही-भातात, पुलाव किंवा फ्राईड राईसच्या तुलनेत कमी कॅलरीज असतात. याने पोट भरल्यासारखे जाणवेल आणि वजन कमी होण्यात मदत मिळेल.
खाण्यापूर्वी किंवा नंतर कधीही दह्याचे सेवन केले जाऊ शकते. दह्यात आढळणारे कॅल्शियम शरीरात फॅट सेल्स तयार होऊ देत नाही. दह्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
पचनसंस्थेसाठीही दही-भात उपयुक्त ठरतो. दही भाताचे सेवन शरीर थंड ठेवण्यात मदत करते.