Yoga: ५ सोपी योगासने, जी तुम्ही घर, ऑफिस किंवा प्रवासात कुठेही करू शकता!

पुढारी वृत्तसेवा

योग केवळ स्टुडिओ किंवा घरापुरता मर्यादित नसतो; तो कुठेही, केव्हाही केला जाऊ शकतो.

सकाळचा वेळ योगासाठी अधिक चांगला मानला जातो. यामुळे संपूर्ण दिवस ऊर्जावान जातो.

झोपण्यापूर्वी केलेले काही योग श्वसन सुधारतात आणि झोपेची गुणवत्ता वाढवतात.

या योगासनांसाठी ना मॅट, ना साधनं लागतात. फक्त थोडी जागा आणि मनाची तयारी आवश्यक आहे.

ताडासन - शरीरात संतुलन व स्थिरता

ताडासन घर, पार्क किंवा ऑफिसमध्ये सहज करता येतो. यामुळे पाठीचा कणा सरळ राहतो आणि चांगली स्ट्रेचिंग होते.

 वज्रासन - पचन सुधारण्यासाठी उपयुक्त

घुटणावर बसून केल्या जाणाऱ्या वज्रासनामुळे अन्नपचन सुधारते. हे ध्यानासाठी आदर्श आसन आहे.

अर्ध चक्रासन - थकवा दूर करण्यासाठी

पाठीवरचा व पोटाचा ताण कमी करण्यासाठी अर्ध चक्रासन प्रभावी आहे. कुठेही उभं राहून हे करता येतं.

 अनुलोम-विलोम प्राणायाम - मन शांत ठेवण्यासाठी

हवेच्या श्वासोच्छ्वासावर नियंत्रण ठेवून तणाव, चिंता कमी करता येते. कुठेही बसून करता येणारी प्रक्रिया.

ब्रह्म मुद्रा - डेस्क वर्क करणाऱ्यांसाठी उपयोगी

डोकं चार दिशांनी फिरवण्याने मानेचा ताण कमी होतो. माइग्रेन व थकवा दूर होतो.

ही योगासने दैनंदिन जीवनात समाविष्ट करून तुम्ही तुमचं मानसिक व शारीरिक आरोग्य सुधारू शकता.