Dudhi bhopla juice : दररोज दूधी भोपळा ज्यूस पिल्यास शरिरात होतील हे बदल!

पुढारी वृत्तसेवा

दूधी भोपळा हो आरोग्यासाठी संजीवनी मानला जातो याचा रस घेतला तर वजन तर कमी होते तर हृदयाच्या आरोग्यापर्यंत अनेक लाभ दूधी भोपळा ज्यूस घेतल्याने होते.

यात कॅलरीजचे प्रमाण अत्यंत कमी आणि फायबरचे प्रमाण भरपूर असते. यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि भूक नियंत्रणात राहून वजन कमी करण्यास मदत होते.

यातील विरघळणारे फायबर आणि पाण्याचे उच्च प्रमाण बद्धकोष्ठता, गॅस, ॲसिडिटी आणि अपचनाच्या समस्या दूर ठेवून पचनसंस्था निरोगी ठेवते.

दूधीमध्ये सुमारे ९२% पाणी असते. हा रस शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढतो आणि शरीराला नैसर्गिक थंडावा देतो.

यातील पोटॅशियम आणि फायबर उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे हृदयाचे रक्षण होते.

हा रस शरीरातील टाकाऊ आणि विषारी घटक बाहेर काढून मूत्रपिंड (किडनी) आणि यकृताचे (लिव्हर) कार्य सुरळीत ठेवतो.

यातील अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन 'सी' त्वचेला खोलवर पोषण देतात, ज्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते आणि मुरुमे किंवा उष्णतेचे विकार कमी होतात.

दूधीच्या रसात शामक गुणधर्म असतात, जे मानसिक ताण कमी करण्यास आणि शांत झोप मिळण्यास मदत करतात.

दूधी भोपळ्याचा रस पिण्यापूर्वी तो कडू नाही ना, याची खात्री करून घ्या. कडू भोपळ्याचा रस आरोग्यासाठी अत्यंत विषारी ठरू शकतो.