Namdev Gharal
शेवगा हा आर्युवदामध्ये खूप महत्वाचा आहे, बहुगुणी अनेक रोगांमध्ये शेवगा हा खूप उपयुक्त ठरते, शेवगा साल, पाने व शेंगा याचा उपयोग खूप केला जातो, भाजी आमटीसाठी अनेकांचा तो फेवरेट असतो
शेवगा पाने व सैंधव मिठ यांचे कॉम्बिनेशन तुम्हाला संधीवातामध्ये खूप फायदेशिर ठरु शकते, यासाठी खूप सोपी पद्धत आहे पावसाळ्यात याच्या उपयोगाने खूप आराम मिळू शकतो .
सध्या पावसाळा सुरु आहे या ढगाळी वातावरणात खूप लोकांना त्रास सांधे दुखी सुरु होते. सांधे जखडतात व वेदना सुरु होतात हालचाली मंदावतात
यावेळी शेवग्याची पाने व सैंधव मिठाची पोटली तयार करुन त्याचा शेक या दुखणाऱ्या सांध्याना दिला तर यामुळेवेदना, जखडन, सूज कमी होते व आराम मिळतो
यामध्ये शेवग्याची १- २ वाटी पाने घ्यावी ती पाने वाटायची व तव्यावर गरम करुन त्यात १-२ चमचे सैंधव मीठ घालायचे आहे. हे सर्व एक सुती कापडात बांधायचे गरम असतानाच या दुखऱ्या सांध्याना शेक द्यायचा आहे
ही पोटली उपयोगी ठरते शेवग्याच्या पानांमध्ये प्रक्षोभकविरोधी (Anti-inflammatory) आणि वेदनाशामक घटक असतात. व सैंधव मीठ उष्णता दीर्घकाळ टिकवून ठेवण्यास मदत करते. यामुळे चांगला शेक बसतो
तसेच आयुर्वेदात सांधेदुखी, सूज आणि संधिवाताच्या (Arthritis) त्रासावर शेवग्याचा पानाचा शेक अत्यंत प्रभावी मानला जातो. त्याबरोबर सैंधव मिठातील नैसर्गिक खनिजे सांध्यांची ताठरता (Stiffness) कमी करून स्नायूंना आराम देतात.
पोटलीचे तापमान त्वचेला सहन होईल इतपत कोमट असल्याची खात्री करा. दुखणाऱ्या सांध्यावर हलक्या हाताने १० ते १५ मिनिटे गोलाकार फिरवत शेक द्या
सांध्यांमधील रक्तभिसरण सुधारते आणि सूज वेगाने कमी होते.वातदोष शांत होऊन तीव्र वेदना आणि कडकपणापासून तत्काळ आराम मिळतो.