Health Risks : अतिउष्ण चहा-कॉफी पिण्याची सवय पडू शकते महागात!

पुढारी वृत्तसेवा

अनेक लोकांना अगदी उकळता चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. पण हीच सवय तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते.

नुकत्याच समोर आलेल्या एका वैद्यकीय संशोधनातून उकळती किंवा अतिगरम पेये पिणाऱ्यांसाठी धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

संशोधनानुसार, अतिउष्ण पेय सतत प्यायल्याने ‘एसोफेगल कॅन्सर’ म्हणजेच अन्ननलिकेचा कर्करोग होण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो.

कोमट चहा किंवा कॉफी पिणाऱ्यांच्या तुलनेत, अतिशय गरम पेये पिणाऱ्यांमध्ये या कर्करोगाची शक्यता जवळपास तिप्पट आढळली आहे.

अतिउष्ण पेय जेव्हा घशातून अन्ननलिकेवाटे जठराकडे जाते, तेव्हा मार्गातील संवेदनशील पेशींना गंभीर इजा पोहोचू शकते.

हा कर्करोग सामान्यतः दुर्मीळ असला, तरी रोज गरम पेयांमुळे पेशी वारंवार भाजल्या गेल्यास किंवा दुखावल्या गेल्यास हा धोका अधिक वाढतो.

तज्ज्ञांच्या मते, अतिउष्ण चहा-कॉफीच्या वारंवार सेवनामुळे ‘एसोफेजियल स्क्वॅमस सेल कार्सिनोमा’ हा विशिष्ट कर्करोग होण्याचा धोका उद्भवतो.

चहा किंवा कॉफी कपमध्ये ओतल्यानंतर लगेच पिण्याऐवजी ती थोडी थंड किंवा कोमट होऊ द्या आणि मगच आस्वाद घ्या.

चवीपेक्षा शरीराची काळजी महत्त्वाची आहे. गरम पेयांचे तापमान थोडे कमी करून स्वतःला मोठ्या आजारांपासून सुरक्षित ठेवा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.