Namdev Gharal
आशियाई जंगलात विषेशता इंडोनेशिया (जावा, सुमात्रा, बोर्नियो), मलेशिया, थायलंड आणि म्यानमार या देशांमध्ये ह साप आढळतो
याचे वैशिष्ट्ये म्हणजे चिनी लोककंथामध्ये असणाऱ्या ड्रॅगनसारखा हा दिसतो. याच्याही अंगावर ड्रॅगनसारखे खवले असतात यामुळे त्याला 'ड्रॅगन स्नेक' म्हटले जाते.
याचे शास्त्रीय नाव झेनोडर्मस जाव्हॅनिकस (Xenodermus javanicus) असे असून, याच्या पाठीवरील खवल्यांची रचना पौराणिक ड्रॅगनसारखी दिसत असल्याने त्याला 'ड्रॅगन स्नेक' म्हटले जाते.
इतर सापांची त्वचा गुळगुळीत असते, मात्र याच्या पाठीवर मणक्याच्या समांतर अशा तीन उंचवट्यांच्या रांगा असतात. ही रचना एखाद्या लहान ड्रॅगन किंवा मगरीच्या पाठीसारखी दिसते.
आकाराने अत्यंत लहान: दिसायला ड्रॅगनसारखा भयानक भासत असला तरी याची लांबी फक्त २ ते २.५ फूट (६० ते ८० सेमी) एवढीच असते.
धोका जाणवल्यास हा पळून न जाता लाकडाच्या काठीसारखा ताठ होतो. शिकारी प्राणी त्याला निर्जीव समजून सोडून देतात.
दमट जंगलांमध्ये, दलदलीच्या भागात आणि भाताच्या शेतांजवळ याचे वास्तव्य असते. हा जमिनीखाली किंवा ओल्या पानांच्या ढिगाऱ्याखाली लपून राहणे पसंत करतो.
हा साप मानवांसाठी अजिबात घातक नाही. हा १००% बिनविषारी असून अत्यंत शांत आणि लाजाळू स्वभावाचा असतो.
निशाचर : हा साप दिवसा जमिनीखाली किंवा कपारीत लपून राहतो आणि रात्री अन्नाच्या शोधात बाहेर पडतो. याचे मुख्य अन्न बेडूक , मासे आणि लहान कीटक हे आहे.
हा साप अत्यंत संवेदनशील असतो. मानवनिर्मित पिंजऱ्यात किंवा पाळीव म्हणून ठेवल्यास तणावामुळे तो खाणे-पिणे सोडून देतो आणि मरतो.