वजन कमी करायचंय? डोसा की उत्तप्पा... कोणता पदार्थ आहे सर्वात जास्त हेल्दी?

पुढारी वृत्तसेवा

डोसा की उत्तप्पा?

वजन कमी करत असाल तर नाश्त्यासाठी नेमका कोणता पर्याय निवडावा? जाणून घ्या दोघांमधला फरक.

दोघेही एकाच पिठाचे... तरी फरक काय?

डोसा आणि उत्तप्पा दोन्ही तांदूळ व उडीद डाळीच्या आंबवलेल्या पिठापासून तयार होतात. मात्र बनवण्याची पद्धत, जाडी आणि पोषणमूल्यांमध्ये फरक असल्यामुळे त्यांचे आरोग्यदायी फायदेही वेगळे असतात.

डोसा का ठरतो हलका पर्याय?

डोसा पातळ असल्यामुळे त्यासाठी कमी पीठ वापरले जाते. त्यामुळे त्यात कॅलरी तुलनेने कमी असतात. वजन कमी करणाऱ्यांसाठी हा एक हलका आणि चांगला पर्याय मानला जातो.

उत्तप्पा जास्त पोट भरणारा

उत्तप्पा जाड असतो आणि त्यावर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची यांसारख्या भाज्या घातल्या जातात. त्यामुळे तो अधिक पौष्टिक आणि पोट भरणारा आहार आहे.

फायबरमध्ये कोण पुढे?

उत्तप्प्यावर असलेल्या भाज्यांमुळे त्यात फायबरचे प्रमाण वाढते. त्यामुळे पचन सुधारते आणि जास्त वेळ भूक लागत नाही.

वजन कमी करायचं असेल तर...

जर तुम्ही फक्त कॅलरी मोजत असाल तर साधा डोसा योग्य पर्याय ठरू शकतो. मात्र कमी खाऊन जास्त वेळ पोट भरलेलं ठेवायचं असेल तर उत्तप्पा अधिक फायदेशीर ठरू शकतो.

तेल किती वापरता, हेही महत्त्वाचं!

डोसा असो किंवा उत्तप्पा... जास्त तेल वापरलं तर दोन्हींच्या कॅलरी वाढतात. त्यामुळे कमी तेलात तयार केलेले पदार्थच आरोग्यासाठी चांगले.

सोबत काय खाता, त्यावरही अवलंबून

डोसा किंवा उत्तप्पा सांबार आणि नारळाच्या मर्यादित चटणीसोबत खाल्ल्यास पोषणमूल्य वाढते. बटाट्याची भाजी किंवा जास्त तेलकट पदार्थ टाळल्यास फायदा अधिक होतो.

मग नेमकं काय खावं?

हलका नाश्ता हवा असेल तर डोसा उत्तम. पोटभर आणि फायबरयुक्त जेवण हवं असेल तर उत्तप्पा अधिक योग्य. दोन्ही पदार्थ योग्य प्रमाणात खाल्ले तर आरोग्यासाठी फायदेशीरच आहेत.

लक्षात ठेवा...

डोसा आणि उत्तप्पा यांच्यात 'सर्वोत्तम' असा एकच पर्याय नाही. कमी तेल, भरपूर भाज्या आणि संतुलित आहार हीच निरोगी जीवनशैलीची गुरुकिल्ली आहे.

सलग 30 दिवस बाजरीची भाकरी खाल्ली तर शरीरात काय बदल होतात?

येथे क्लिक करा