Namdev Gharal
पूर्वी आजी-आजोबा किंवा आई रात्रीच्या वेळी मुलांना प्रेमाने दूध-भात कालवून भरवायचेत, पण हल्ली हे चित्र कमी झाले आहे. जिभेला फास्ट फूड आणि पॅकबंद पदार्थांची चटक लागली आहे.
पण दूध भात हा पारंपारिक भारतीय आहारातील एक अत्यंत साधे, सात्त्विक आणि पचायला हलके असे पौष्टिक अन्न मानले जाते. आरोग्याच्या दृष्टीने याचे अनेक महत्त्वपूर्ण फायदे आहेत
दूध-भाताचे मिश्रण मऊ आणि पचनास अतिशय हलके असते. अॅसिडिटी, पोटात जळजळ किंवा अपचनाचा त्रास होत असल्यास दूध भात पोटाला त्वरित थंडावा देतो आणि आतड्यांना आराम मिळवून देतो.
भातातून शरीराला आवश्यक कार्बस मिळतात, तर दुधातून उत्तम दर्जाचे प्रोटीन, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D मिळतात. यामुळे शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते.
दुधामध्ये 'ट्रिप्टोफॅन' (Tryptophan) नावाचे अमिनो अॅसिड असते, जे मेलाटोनिन आणि सेरोटोनिन हार्मोन्स वाढवण्यास मदत करते. त्यामुळे रात्रीच्या वेळी कोमट दूध-भात खाल्ल्याने मनाचा ताण कमी होतो आणि शांत झोप लागते.
हाडे आणि दातांचे आरोग्य: दुधातील भरपूर कॅल्शियम आणि फॉस्फरस लहान मुलांच्या वाढीसाठी तसेच प्रौढांच्या हाडांच्या मजबुतीसाठी फायदेशीर ठरते.
आजारपणानंतर शक्ती भरून काढणे: ताप, पोटाचे विकार किंवा अशक्तपणा आल्यानंतर शरीर पूर्ववत होण्यासाठी दूध-भात एक उत्तम ‘रिकव्हरी फूड’ म्हणून काम करते.
दूध-भात नेहमी ताजा, मऊ शिजवलेला आणि कोमट असावा. चवीसाठी त्यात साखरेऐवजी थोडा गूळ, वेलची किंवा साजूक तूप घालणे अधिक आरोग्यदायी ठरते.
आधुनिक काळात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत पिझ्झा, बर्गर, नूडल्स किंवा पॅकबंद स्नॅक्ससारख्या तीव्र चवीच्या पदार्थांचे आकर्षण वाढले आहे परीणामी दुध भात हा आहार कमी झाला आहे
जिभेला सतत तिखट, तळलेले आणि मसालेदार खाण्याची सवय झाल्याने दूध-भातासारखी साधी, सौम्य आणि नैसर्गिक चव अनेकांना अळणी किंवा बेचव वाटते