अंजली राऊत
साबुदाणा – 1 कप (4-5 तास भिजवून निथळलेला), बटाटे – 2 मध्यम (सालं काढून उकडलेले आणि कुस्करलेले), भाजलेले शेंगदाणे – अर्धा कप (दळून थोडेसे दरदरे असे), हिरव्या मिरच्या 2-3 (बारीक चिरून), साजूक तूप / तेल – थोडंसं, इडली पात्राचे साचे ग्रीस करण्यासाठी, थोडीशी कोथिंबीर, जिरे अर्धा टीस्पून, मीठ – चवीनुसार आणि लिंबाचा रस – 1 टीस्पून (ऐच्छिक)
एका मोठ्या परातीमध्ये भिजवलेला साबुदाणा, कुस्करलेले बटाटे, शेंगदाण्याचं कूट, मिरच्या, जिरे, मीठ, कोथिंबीर एकत्र करून मिक्स करा. मिश्रण थोडंसं घट्टसर ठेवा
इडली पात्राचे साचे तूपाने किंवा तेलाने ग्रीस करा
प्रत्येक साच्यामध्ये छोट्या वड्याच्या आकारात मिश्रण घालून थोडं थापून द्या. खूप जाडसर करू नका, थोडे पातळ ठेवा म्हणजे कुरकुरीत होतील.
कुकर किंवा इडली पात्रात पाणी गरम करून साचे त्यावर ठेवा आणि 12-15 मिनिटे मध्यम आचेवर वाफवा. झाकण लावा, पण शिटी नको
वाफवलेले असे साबुदाणे वडे तुम्ही गरमागरम खाऊ शकतात किंवा कुरकुरीत हवे असतील तर थोडंसं तूप टाकून तव्यावर / एअर फ्रायरवर 5-7 मिनिटं परतून घ्या.
वड्यातील खास टिप अशी की,
तिखटपणा हवे असेल तर लाल तिखट थोडंसं घालू शकतात, हे वडे उपवासासाठी बनवत असाल, तर मिठाऐवजी सैंधव मीठ वापरा आणि लिंबाचा रस घातल्यामुळे चव चटकदार लागते.