Donald Trump Movies |डोनाल्‍ड ट्रम्‍प झळकले आहेत ‘या‘ चित्रपटात

Namdev Gharal

घोस्ट्स कान्ट डू इट (१९८९) 

या रोमँटिक कॉमेडी चित्रपटात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका छोट्या दृश्यात व्यावसायिकाची भूमिका साकरली आहे.

होम अलोन २ (१९९२)

या गाजलेल्‍या चित्रपटात हॉटेलच्या लॉबीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना चित्रपटातील मुख्य पात्र असलेला लहान मुलगा (मॅकॉले कल्किन ) दिशा विचारतो.

द लिटिल रास्कल्स (१९९४)

डोनाल्ड ट्रम्प या चित्रपटात प्रमुख पात्र असलेल्‍या एका मुलाचे श्रीमंत वडील झाले आहेत.

अक्रॉस द सी ऑफ टाइम (१९९५)

या कौंटुंबिक चित्रपटात, डोनाल्ड ट्रम्प न्यूयॉर्क शहराला भेट देणाऱ्या एका लहान मुलाचे स्वागत करताना दिसतात.

द असोसिएट (१९९६)

हूपी गोल्डबर्ग यांची भुमिका असलेल्‍या या चित्रपटात, डोनाल्ड ट्रम्प एक व्यावसायिक झाले आहेत.

झूलँडर (२००१)

या चित्रपटात डोनाल्ड ट्रम्प स्वतःची भूमिका साकारत आहेत. ते चित्रपटातील मुख्य पात्र, फॅशन मॉडेल डेरेक झूलँडर (बेन स्टिलरने साकारलेली) या बद्दल बोलतात.

टू वीक्स नोटिस (२००२)

या चित्रपटात डोनाल्ड ट्रम्प एका चॅरिटी कार्यक्रमात एका व्यावसाईकाच्या भूमिकेत दिसतात.

चित्रपटांबरोबरच स्‍पिन सिटी, द नॅनी, द फ्रेश प्रिन्स ऑफ बेल एअर इत्‍यादी टिव्ही शो मध्येही डोनाल्‍ड ट्रम्‍प दिसून येतात.