पुढारी वृत्तसेवा
रेबिज प्रामुख्याने संक्रमित प्राणी, जसे की कुत्रा याच्या चावण्याने पसरतो.
पण, वेळीच लवकर उपचार केल्यास रेबीज पूर्णपणे टाळता येतो.
रेबीज पॉझिटिव्ह प्राण्याने चावा घेतल्यास, जखम किमान १५ मिनिटे वाहत्या पाण्याने धुवा.
त्यानंतर जखम जंतुनाशकाने पूर्णपणे धुवा आणि त्वरित वैद्यकीय मदत घ्या.
यामुळे विषाणूचा (Virus) बराचसा धोका कमी होतो.
त्वरित डॉक्टरांना भेटा आणि रेबीज प्रतिबंधक लस (Anti-rabies Vaccine) घ्या.
लक्षात ठेवा वेळेवर घेतलेल्या लसीकरणामुळे तुमचा जीव वाचू शकतो.