पुढारी वृत्तसेवा
झोपताना नाक बंद झाल्यामुळे झोपेत व्यत्यय येतो. मग पुढील उपाय वाचा आणि करून पहा...
थंडीच्या दिवसांमध्ये किंवा सर्दी झाल्यावर झोपले की नाक बंद होते. यामुळे श्वास घेण्यात अडथळा निर्माण होतो. यावेळी अस्वस्थ वाटू शकते.
नाक बंद झाल्यावर गरम पाण्याची वाफ घेणे हा एक चांगला उपाय आहे. यामुळे शिरा मोकळ्या होउन नाक मोकळे होते.
कोमट पाण्यात थोडे मीठ टाकून त्याच्या गुळण्या केल्याने घशातील सूज कमी होते. यामुळे नाक मोकळे होण्यास मदत होते.
नाका बंद झाल्यावर नाकात निलगिरी किंवा तिळाच्या तेलाचे काही थेंब सोडल्यास आराम मिळतो.
अशावेळी गवती किंवा आले टाकून केलेला गरम चहा पिल्यानेही आराम मिळतो.
झोपण्याच्या स्थितीचाही यावर परिणाम होतो. नाक बंद झाल्यावर एका बाजुला झोपावे किंवा पाठिवर झोपणे योग्य.
वरील काही उपाय असले तरी जास्त त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक.