Helmet and Hair loss : हेल्मेट घातल्यामुळे केस गळतात का?

Namdev Gharal

बाईक चालवताना हेल्मेट घालणे आवश्यकच आहे.पण अनेक लोकांची तक्रार असते की हेल्मेटमुळे आपले केस गळतात

हे खरे असेल का, की हेल्मेट वापरण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे केसांच्या समस्या उद्भवू शकतात. या विषयावर तज्ज्ञांचे मत काय आहे हे पाहू

जर तुमचे हेल्मेट खूप घट्ट असेल आणि तुम्ही ते वारंवार घर्षण होईल असे काढत किंवा घालत असाल, तर केसांच्या मुळांवर ताण येतो.

हेल्मेट घातल्यामुळे डोक्याच्या त्वचेवर (Scalp) हवा खेळती राहत नाही. यामुळे घाम येतो आणि आर्द्रता वाढते. ही परिस्थिती बॅक्टेरिया आणि बुरशी वाढण्यासाठी पोषक असते.

अजून एक गोष्ट म्हणजे कोंडा आणि संसर्ग घामामुळे टाळूवर घाण साचते, ज्यामुळे कोंडा होतो किंवा टाळूला खाज सुटते. यामुळे केसांची मुळे कमकुवत होतात.

तज्ञांच्या मते केसांना ऑक्सिजन हवेतून मिळत नाही, तर तो रक्ताभिसरणाद्वारे मिळतो. त्यामुळे हेल्मेटमुळे केसांचा श्वास गुदमरतो हा एक गैरसमज आहे.

जर तुम्ही हेल्मेट घालण्यापूर्वी डोक्याला सुती रुमाल किंवा स्कार्फ बांधा. यामुळे घाम शोषला जातो आणि केसांचे हेल्मेटसोबत थेट घर्षण होत नाही

हेल्मेटचे आतील पॅडिंग वेळोवेळी काढून धुवा. त्यात साचलेली घाण आणि बॅक्टेरिया केस गळतीला कारणीभूत ठरतात

हेल्मेट खूप घट्ट किंवा खूप सैल नसावे. ते डोक्यावर व्यवस्थित फिट बसेल याची काळजी घ्या. त्‍यामुळे योग्य आकाराचे हेल्मेट घेणे खूप आवश्यक आहे

अजून एक महत्‍वाची गोष्ट म्हणजे ओल्या केसांवर कधीही हेल्मेट घालू नका. यामुळे फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो