पुढारी वृत्तसेवा
हिवाळ्यात किंवा थंडीच्या दिवसांत सतत टोपी घातल्यामुळे केसांवर परिणाम होतो का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
पण, सतत टोपी घातल्यानं थेटपणे केसगळतीची समस्या होत नाही.
जास्तवेळ डोकं झाकूण ठेवल्याने घाम येतो आणि त्यामुळे केसांमध्ये कोंडा होतो. याच कारणाने डोक्याच्या त्वचेमध्ये इन्फेक्शन होते.
जर टोपी फार घट्ट असेल तर केसांवर अधिक घर्षण होते. यामुळे केस तुटण्याची शक्यता असली तरी ते केस गळण्याचे महत्त्वाचे कारण नाही.
म्हणजेच, टोपी केसगळतीचे मुख्य कारण नाही. केसांची किंवा डोक्याची स्वच्छता महत्वाची आहे.
तसेच, केसांच्या मुळांना हवेतून नव्हे तर रक्तवाहिन्यांमधून ऑक्सिजन आणि पोषक द्रव्ये मिळतात. टोपी घातल्याने गुदमरत नाहीत.
केस गळण्याची कारणे आनुवंशिकता, हार्मोनल बदल आणि आरोग्य परिस्थिती यासह अनेक आहेत.
या तुलनेत टोपी हा किरकोळ घटक आहे.