पुढारी वृत्तसेवा
लाईट सुरूच राहते
अनेक घरांमध्ये आणि ऑफिसमध्ये लाईटचा स्विच ऑफ केल्यानंतरही बल्ब मंद प्रकाशासह सुरूच राहतो. असे का होते, जाणून घेऊया.
करंट लीक होऊ शकतो
काही वेळा घरातील करंट लीक होत असल्यामुळे स्विच ऑफ केल्यानंतरही बल्ब मंद प्रकाश देत राहतो. हे धोक्याचे लक्षण असू शकते.
वायरिंग चुकीची असू शकते
स्विच बोर्डच्या आत चुकीची वायरिंग असल्यास वीजपुरवठा पूर्णपणे बंद होत नाही. त्यामुळे बल्ब मंद प्रकाशासह सुरू राहू शकतो.
खराब स्विच असू शकतो कारण
स्विच खराब किंवा त्यामध्ये घाण साचलेली असल्यास तो वीजपुरवठा योग्य पद्धतीने बंद करू शकत नाही. त्यामुळे बल्ब सुरू राहण्याची शक्यता असते.
स्वस्त बल्बही कारणीभूत
बाजारात मिळणाऱ्या काही स्वस्त LED बल्बमध्ये सर्किटमध्ये साठलेली वीज योग्य पद्धतीने डिस्चार्ज होण्याची व्यवस्था नसते. त्यामुळे स्विच ऑफ केल्यानंतरही ते मंद प्रकाश देत राहू शकतात.
करंट लागण्याचा धोका
या समस्येकडे दुर्लक्ष करू नये. जर यामागे वायरिंगची समस्या किंवा करंट लीक होण्याचे कारण असेल, तर विजेचा धक्का लागण्याचा धोका वाढू शकतो.
आग लागण्याचाही धोका
वायरिंगमध्ये बिघाड असल्यास शॉर्ट सर्किट किंवा आग लागण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ही समस्या लवकरात लवकर एखाद्या तज्ज्ञ इलेक्ट्रिशियनकडून तपासून घ्यावी.
बल्बचे आयुष्य कमी होऊ शकते
करंट लीक होणे किंवा बल्बला सतत कमी प्रमाणात वीज मिळत राहिल्यामुळे LED बल्बचे आयुष्य कमी होऊ शकते आणि तो लवकर खराब होऊ शकतो.
समस्या दूर करण्याचा उपाय
सर्वप्रथम बल्ब बदलून पाहा. नवीन बल्ब लावल्यानंतरही तीच समस्या जाणवत असेल, तर घरातील वायरिंग आणि स्विच एखाद्या चांगल्या इलेक्ट्रिशियनकडून नक्की तपासून घ्या.